शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी तीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:19 IST

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव व वडगाव या दोन गावांत एका तासाच्या अंतरात घरे फोडून धाडसी चोरी केली. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २६ हजारांचा ऐवज लांबविला आहे. तर एका ग्रामस्थाच्या तोंडावर वीट फेकून मारून जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आखाडा बाळापूर/ वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील रेडगाव व वडगाव या दोन गावांत एका तासाच्या अंतरात घरे फोडून धाडसी चोरी केली. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २६ हजारांचा ऐवज लांबविला आहे. तर एका ग्रामस्थाच्या तोंडावर वीट फेकून मारून जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील तातेराव शिवाजीराव तरटे (३४) यांच्या राहते घरी १६ आॅगस्ट रात्री १०.३० ते १७ आॅगस्ट चे १२.३० वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्याचे दागिने व नगदी ७० हजार असा एकूण १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गावातीलच नामदेव केशव मगर यांच्या घरी चोरी करणाऱ्यांना पाहिल्याने कल्याण केशव मगर यांच्या तोंडावर विट फेकून मारली व चोरटे पसार झाले. यात कल्याण जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रेडगावकडे वळविला. रेडगाव येथील चुडामण रंगराव पवार (३४) यांच्या राहत्या घरी १७ आॅगस्ट रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे मणिमंगळसूत्राची पोत-२ नग, झुंबर, वेल, फूल, पानाची पोत, नेकलेस, कानातल्या काड्या, गळ्यातले ओम, चांदीचे कमरेच्या साखळ्या, कडे, वाळे, बिंदले असे सोन्या चांदीचे दागिने व रोख ३४ हजार रुपये असा एकूण १.९४ लाखांचा माल चोरुन नेला. आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हे दाखल झाले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा