शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीतील इसापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिन मित्रांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:39 IST

पाच मित्र पोहण्यासाठी धरणावर गेली होती,त्यातील तिघे बुडाली

ठळक मुद्देमृत तिघेही हिंगोली येथील रहिवासी

कळमनुरी (जि. हिंगोली) : पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण जवळील इसापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ७ जून रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या तिघांचेही मृतदेह सापडले असून मयत तरूण हे हिंगोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मयतांची नावे शिवम सुधीर चौंढेकर (२१), रोहित अनिल चित्तेवार (२२), योगेश बालाजी गडप्पा (२१) अशी आहेत.

सविस्तर माहिती अशी की शिवम सुधीर चौंढेकर (२१) रा. भट कॉलनी हिंगोली, रोहित अनिल चित्तेवार (२२) रा. पोस्ट आॅफिस रोड हिंगोली, योगेश बालाजी गडप्पा (२१) रा. बियाणीनगर तसेच श्रीकांत संजीव चौंढेकर व निखिल नागोराव बोलेके हे पाचजण मित्र हिंगोली येथून कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण जवळील इसापूर धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहल्यानंतर श्रीकांत व निखिल हे दोघेजण धरणाबाहेर आले. परंतु शिवम, रोहित आणि योगेश हे पाण्याबाहेर आलेच नाहीत. त्यामुळे श्रीकांत व निखिलने याबाबत जवळील ग्रामस्थांना माहिती दिली.

काही वेळातच घटनास्थळी पोलीस अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. यावेळी गावातील ग्रामस्थही मदतीला धावून आले आणि शोधकार्य सुरू झाले. गोताखोर समशेर खाँ पठाण, कांता पाटील व ग्रामस्थांनी  तब्बल एका तासानंतर वरील तिघांचेही मृतदेह धरणातील पाण्याबाहेर काढले. घटनास्थळी पोनि रंजित भोईटे, फौजदार ज्ञानोबा मुलगीर, ना. तहसिलदार श्रीराम पाचपुते, मंडळाधिकारी यु. आर. डाखोरे पोलीस कर्मचारी शामराव गुहाडे, गणेश सुर्यवंशी, नलावार तात्काळ पोहचले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरणdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू