चार दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:29 IST2018-02-03T00:29:14+5:302018-02-03T00:29:20+5:30
शहरातील हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेली चार दुकाने १ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री फोडून हजारोचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

चार दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शहरातील हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेली चार दुकाने १ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री फोडून हजारोचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
येथील बसस्थानकाजवळ व मुख्य रस्त्यावर असलेल्या खंडू हरिभाऊ काळे यांची एस.के. बियर शॉपीचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यातील १५ हजार रोख व २ बिअरचे बॉक्स किंमत ४ हजार रुपये लंपास केले. नंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या ओमकार वैजनाथ नावडे यांच्या भुसार मालाच्या दुकानाचे शटर तोडले व त्यातील रोख एक हजार रुपये लंपास केले. या दुकानात भुसार माल असल्याने त्यांची निराशा झाली. त्यांनी बाजूलाच असलेल्या गजानन रामदास शिंदे यांचे हॉटेल फोडले येथे चोरट्यांनी भजे, चिवडा खाल्ला व बियरही ढोसली. तेथे बियरच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा माधव धुरपतराव खरवडे यांच्या प्रगती किराणा दुकानाकडे वळविला. या किराणा दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व गल्ल्यात ठेवलेले एक लाख छप्पन हजार व ७ ते ८ हजार रुपयांची चिल्लर लंपास केली. पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग वाकोडी रस्त्यापर्यंत केला. अंधाराचा फायदा घेत चोरटे तेथून बेपत्ता झाले. ही माहिती मिळताच पोनि जी.एस. राहिरे व कर्मचाºयांनी घटनास्थळी पंचनामा केला.
ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले. उशिरापर्यंत चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांनी दोन लाखांच्या जवळपास ऐवज लंपास केला.
मुलीच्या लग्नासाठी काढलेले पैसेही पळविले
माधव खरवडे यांच्या मुलीचे लग्न ठरल्याने त्यांनी १ फेब्रुवारी रोजी महाराष्टÑ ग्रामीण बँकेतून रक्कम काढून ती दुकानात ठेवली होती. मुलीच्या लग्नासाठी एकेक रुपया जमा केला होता. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला. आता मुलीचे लग्न कसे करावे? असा प्रश्न खरवडे यांच्या समोर आहे. जमा केलेली रक्कम गेल्याने त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले होते. आता एवढी रक्कम कशी जमा करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. दरम्यान फौजदार एस.एस. घेवारे, रिठ्ठे, जोगदंड हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना दोघेजण नवीन बसस्थानकाजवळ आढळून आले. पोलिसांना पाहताच हे दोघे जण मोटारसायकल घेवून सुसाट वेगाने जात होते. चिल्लर रक्कम लमानदेवजवळच्या रस्त्यावर टाकून पळाले.