केसापूर येथे साडेतेरा हजारांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:06+5:302021-05-07T04:31:06+5:30
हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून ५ मे ...

केसापूर येथे साडेतेरा हजारांची दारू पकडली
हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून ५ मे राेजी येथील शोभाबाई माधव पवार यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू व २०० लिटर गूळमिश्रित मोहफुलाचे रसायन आढळून आले. त्यानंतर भागाबाई दिलीप पवार यांच्या ताब्यातून ४ हजार ५०० रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू व २०० लिटर मोहफुलाचे रसायन जप्त केले. तिसऱ्या कारवाईत सुनीताबाई त्रिमुक पवार यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये किमतीचे २० लिटर गावठी हातभट्टीची दारू व २०० लिटर मोहफुलाचे रसायन जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे पो.ह. शंकर जाधव, राजूसिंह ठाकूर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास सपोउपनि. जाधव करीत आहेत.