महाआवास अभियानात हिंगोली जिल्हा परिषद विभागात तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:17+5:302021-09-03T04:30:17+5:30
केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण गतिमान करण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ ...

महाआवास अभियानात हिंगोली जिल्हा परिषद विभागात तृतीय
केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण गतिमान करण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्यात महाआवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या हस्ते ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विभागात औरंगाबाद जिल्हा परिषद प्रथम, उस्मानाबाद द्वितीय आणि हिंगोली जिल्हा परिषद तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्य पुरस्कार योजनेत विभागात उस्मानाबाद जिल्हा परिषद प्रथम, औरंगाबाद द्वितीय आणि परभणीला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
या निकषावर करण्यात आली निवड
भूमिहीन लाभार्थी यांना जागा उपलब्ध करून देणे, मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, भौतिकदृष्ट्या घरकुल पूर्ण करणे, आर्थिकदृष्ट्या घरकुल पूर्ण करणे, गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणे, आवास प्लस अंतर्गत आधार तसेच जॉब कार्ड लिंक करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे आदी निकषावर ही निवड करण्यात आली.