लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आत्महत्या, दुसरे लग्न का केले म्हणून दिला जात होता त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:33 IST2018-06-20T21:32:51+5:302018-06-20T21:33:58+5:30
दुसरे लग्न का केले, या कारणावरून त्रास दिल्यामुळे कृष्णा उत्तम नरवाडे (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आत्महत्या, दुसरे लग्न का केले म्हणून दिला जात होता त्रास
कुरूंदा (जि. हिंगोली) : दुसरे लग्न का केले, या कारणावरून त्रास दिल्यामुळे कृष्णा उत्तम नरवाडे (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पार्डी खु. येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पार्डी खुर्द येथील कृष्णा याची पहिली पत्नी मरण पावली होती. पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे. पहिली पत्नी जळून मरण पावल्यामुळे त्याही प्रकरणी गुन्हा दाखल होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
मृताने आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर दुसरे लग्न केले होते. पूर्वीचेच प्रकरण मिटले नसताना तू दुसरे लग्न का केले म्हणून पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांकडून मानसिक त्रास देऊन धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून कृष्णाने मंगळवारी शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार बळवंत नरवाडे यांनी कुरूंदा पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून गजानन कदम (रा. देवगाव, ता. अर्धापूर), चंक्रधर इंगोले (रा. पार्टी खुर्द) या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि शंकर वाघमोड हे करीत आहेत.