चोरट्यांचा रोख रक्कमेसह सोने-चांदीच्या दागिन्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:32 IST2021-09-21T04:32:52+5:302021-09-21T04:32:52+5:30

हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात सय्यद फहेदअली सय्यद सादीकअली राहतात. दि. १८ सप्टेंबर रोजी ते परभणी येथे सहकुटुंब गेले होते. ...

The thieves stole gold and silver jewelery along with cash | चोरट्यांचा रोख रक्कमेसह सोने-चांदीच्या दागिन्यावर डल्ला

चोरट्यांचा रोख रक्कमेसह सोने-चांदीच्या दागिन्यावर डल्ला

हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात सय्यद फहेदअली सय्यद सादीकअली राहतात. दि. १८ सप्टेंबर रोजी ते परभणी येथे सहकुटुंब गेले होते. जातांना घराला कुलूप लावले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉकर तोडून त्यातील रोख ५० हजार व ४५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. दागिन्यात ३२ हजारांचे कानातील सोन्याचे झुमके, आठ हजारांचे नाकातील बाळी, पाच हजारांचे पायातील चांदीचे चेन तसेच सोने खरेदी केलेल्या बिलाच्या पावत्यांचा समावेश आहे. २० सप्टेंबर रोजी सय्यद फहेदअली हे परत आले असता घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सय्यद फहेदअली सय्यद सादीकअली यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने करीत आहेत.

Web Title: The thieves stole gold and silver jewelery along with cash