बोल्डावाडीत चोरी करणाऱ्यांनी लुटली दारू दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:40+5:302021-09-07T04:35:40+5:30
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोल्डा फाटा येथील चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सूरज नितीन जाधव, वसमत, रमेश नामदेव देवकर, वडारवाडा, ...

बोल्डावाडीत चोरी करणाऱ्यांनी लुटली दारू दुकाने
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोल्डा फाटा येथील चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सूरज नितीन जाधव, वसमत, रमेश नामदेव देवकर, वडारवाडा, हिंगोली, सोनू पिराजी पवार, वसमत, बालाजी नागोराव गोरे वसमत, लखन सुदाम शेडेराव वसमत या पाच जणांना घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच अटक केली होती. यातील आरोपींना ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींकडून रोख दहा हजार रुपये, रेडीमेड कपडे, एक होम थिएटर, एक डीव्हीआर लॅपटॉप असा एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी वसमत तालुक्यात एक बार, एक विदेशी दारू विक्रीचे दुकान, तर दोन देशी दारूची दुकाने फोडल्याचे समोर आले आहे. तपासात त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे याची कबुली दिली. त्याचबरोबर, सांगली जिल्ह्यात अनेक गुन्हे केल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठ्या संख्येने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचीही उपस्थिती होती. यात सपोनि पंढरीनाथ बोधनापोड, फौजदार अच्युत मुपडे, जावेद शखे, कर्मचारी संजय मार्के, रामेश्वर मिसाळ, नागोराव वाबळे, वसंत चव्हाण, फुलाजी सावळे, शिवाजी पवार, भारत डाखोरे, गजानन मुटकुळे, सोपान थिटे यांनी यांनी परिश्रम घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे.