शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतील भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांचा डल्ला

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: December 19, 2022 20:29 IST

आमदार मुटकुळे यांच्यासह चौघांचे घर फोडले,एकाच्या शेळ्या नेल्या चोरून

हिंगोली: भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमदार मुटकुळे यांच्या तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कागदपत्रे व इतर सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. चोरट्यांनी इतर चार ठिकाणीही चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती आखाड्यावरील शेळीचे दोन पिल्ले लागले. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

हिंगोली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे आडगाव मुटकूळे हे गाव आहे. गावात त्यांनी नवीन घराचे बांधकाम केले. मात्र त्यांचे कुटूंबिय जुन्या घरीच राहतात. १८ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी गावात प्रवेश केला आणि मुटकुळे यांच्या नवीन घराचा दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लाकडी प्लायवूडचे कपाट उघडून कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी गावातील ज्ञानबा नवसाजी मुटकुळे, भाऊराव किसनराव मुटकुळे, नारायण सखाराम मुटकुळे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

त्यामुळे चोरट्यांनी आडगाव शिवारातील भागवत पुंजाजी खोरणे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेले शेळीचे दोन पिल्ले लंपास केले. एकाच रात्री चोरट्यांनी चार घरांचे कुलूप तोडून हैदोस घातला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण मळघणे, उपनिरीक्षक म.ए. मुपडे, हवालदार अशिष उंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलदरम्यान, आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी रविवारी गावात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले. मात्र आज चोरीची घटना घडल्याची माहिती त्यांना समजली. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवाजी तान्हाजी मुटकूळे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक एम.एम. मुपडे तपास करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीBJPभाजपाMLAआमदारRobberyचोरी