२२१ अंगणवाड्या झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:00+5:302021-02-05T07:53:00+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची एकसमान रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. ...

२२१ अंगणवाड्या झाल्या बोलक्या
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची एकसमान रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आजपर्यंत २२१ अंगणवाडी केंद्रांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील ५८, सेनगाव ५३, औंढा नागनाथ ३७, वसमत ३७ तर कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील ३६ अंगणवाड्या बोलक्या झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी, डॉ. पोहरे, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाड्या बोलक्या करण्याचे काम सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक पुढाकार घेत आहेत. येत्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या एकसमान रंगरंगोटी करण्याचा मानस आहे. अंगणवाडी केंद्रांना एकसमान करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग करणारा हिंगोली पहिला जिल्हा असणार आहे.
फोटो :