ग्रामपंचायत सदस्यांच्या अजूनही १२ जागा रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:08+5:302021-02-05T07:55:08+5:30

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या ८७५ जागांसाठी मतदान झाले. यापैकी १९ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत तर काही ग्रामपंचायतींमधील ...

There are still 12 vacancies for Gram Panchayat members | ग्रामपंचायत सदस्यांच्या अजूनही १२ जागा रिक्तच

ग्रामपंचायत सदस्यांच्या अजूनही १२ जागा रिक्तच

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या ८७५ जागांसाठी मतदान झाले. यापैकी १९ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत तर काही ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये १२ सदस्यांच्या जागा रिक्तच आहेत.

कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. त्यानंतर १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. तालुक्यातील घोळवा येथे अनुसूचित जमाती महिलासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या सदस्याचे वय २१ वर्ष पूर्ण नसल्यामुळे ही जागा रिक्त राहिली आहे. तसेच आडा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग, कवडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कुपटी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, येगाव येथे अनुसूचित जमाती महिला, साळवा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, खापरखेडा येथे अनुसूचित जमाती महिला, रेनापूर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशी एकूण १२ ग्रामपंचायत सदस्यांची पदे अजूनही रिक्तच आहेत. यातील काही गावांमध्ये त्या प्रभागाचे उमेदवार न मिळाल्यामुळे अथवा त्या जागेवर एकाही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे येथील जागा रिक्त राहिल्या आहेत. सध्या १०९ ग्रामपंचायतींमधील ८७५ जागांपैकी ४९२ जागांवर महिला सदस्य निवडून आल्या आहेत. तालुक्यात ८७५पैकी २६० जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. यामध्ये निवडून आलेल्या महिलांची टक्केवारी ५६.२२ टक्के इतकी आहे.

Web Title: There are still 12 vacancies for Gram Panchayat members