शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:41 IST

तरुणास कोणी आणि का मारहाण केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

- इस्माईल जहागिरदारवसमत (हिंगोली): शहरातून एका १८ वर्षीय युवकास टाकळगाव शिवारातील शेत आखाड्यावर नेऊन काही जणांनी जबर मारहाण केली. त्यानंतर जखमी युवकास वसमत शहराजवळ सोडून देत आरोपींनी पळ काढला. दरम्यान, जखमी युवकास उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. ही घटना मंगळवारी रात्रीस घडली आहे.

वसमत शहरातून १६ मे रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान ओंकार हेरे (१८,ह मु नविन ऐरिकेशन कॉलनी वसमत, रा कन्हेरगाव) या युवकास काही जणांनी टाकळगाव शिवारातील आखाड्यावर नेले. येथे त्याला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला वसमत शहरातील एका शाळेजवळील शेतात टाकण्यात आले. 

दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी युवकास नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून ओंकारला मृत घोषीत केले. माहिती मिळताच सपोनि अनिल काचमांडे, फौजदार संदिप यामावार, अविनाश राठोड, संजय गोरे आदी कर्मचाऱ्यांनी टाकळगाव शिवारातील आखाड्यावर जाऊन पाहणी केली.

तरुणास कोणी आणि का मारहाण केली याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, काही आरोपी वसमत शहरातील असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली