शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने माळहिवरा शिवारात ट्रक उलटला; ८५ शेळ्या मृत्युमुखी

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 19, 2024 17:56 IST

हिंगोली ते कनेरगाव मार्गावर माळहिवरा शिवारात ट्रक उलटला

हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर शेळ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात ट्रकमधील ८५ शेळ्या दगावल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात चालक व क्लिनरला दुखापत झाली नाही.

विदर्भातील मलकापूर भागातून एका ट्रकमध्ये (यूपी-७७-एएन-६९७१) शेळ्या भरून हैदराबादकडे नेल्या जात होत्या. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात ट्रक आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. या अपघातात ट्रकमधील ८५ शेळ्या खाली पडल्या व ट्रक त्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे शेळ्या जागेवरच गतप्राण झाल्या. या अपघातात जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सुदैवाने या अपघातात ट्रक चालक व क्लिनरला गंभीर जखम झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली