शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली नगराध्यक्ष पदाची जागा ठरतेय आमदार मुटकुळे - बांगर यांच्यातील संघर्षाचे मूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:57 IST

हिंगोली विधानसभेवर भाजपाचे वर्चस्व आहे, मागील वेळी येथील नगरपालिकादेखील भाजपच्या ताब्यात होती.

हिंगोली : येथील भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यातील संघर्ष वाढला असून, दररोज एकमेकांवर आरोप केले जात आहेत. हिंगोली येथील नगराध्यक्षपदाची जागा हेच दोन्ही आमदारांच्या संघर्षाचे मूळ आहे.

जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीमध्ये तिन्ही विधानसभांवर सत्तेतील तीन पक्षांचे वर्चस्व आहे. हिंगोली विधानसभेवर भाजपाचे वर्चस्व आहे. मागील वेळी येथील नगरपालिकादेखील भाजपच्या ताब्यात होती. त्यामुळे महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या जागेवर भाजपने दावा सांगितला. मात्र आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली नगरपालिकेसाठी ताकद लावली. त्यामुळे शिंदेसेनेकडून युती धर्म पाळला गेला नाही, अशी भाजपची भावना निर्माण झाली असून, त्यातूनच दोन्ही आमदारांमध्ये दुरावा निर्माण झाला.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने हा दुरावा आता संघर्षात रूपांतरित झाला असून, दोन्ही बाजूने वैयक्तिक पातळीवर टीका केल्या जात आहेत. आमदार संतोष बांगर यांनी सत्तांतराच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० खोके घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला. त्यामुळे खळबळ उडाली. तर दुसरीकडे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या दबावाखाली येऊन १०० पोलिसांनी माझ्या घराची झाडाझडती घेतली, असा आरोप शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला. याशिवाय दोन्ही आमदारांमध्ये वैयक्तिक पातळीवरदेखील आरोप सुरू आहेत. 

हिंगोलीच्या नगराध्यक्ष पदावरून दोन्ही आमदारांमध्ये हा संघर्ष निर्माण झाला आहे. हिंगोलीची जागा आपल्याच पक्षाच्या ताब्यात रहावी, यासाठी ही रस्सीखेच सुरू असून, त्यातून आरोपांच्या फैरी झडत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Mayoral Seat: Mutkule-Bangar Clash Rooted in Power Struggle

Web Summary : Hingoli's mayoral election fuels conflict between BJP's Mutkule and Shinde Sena's Bangar. Accusations fly amidst municipal polls, revealing deep-seated rivalry and power struggles over Hingoli's leadership. Personal attacks intensify as both aim for control.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकsantosh bangarसंतोष बांगरHingoliहिंगोली