शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वसमतच्या मोंढ्यात हळदीस सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला

By विजय पाटील | Updated: August 4, 2023 19:12 IST

आज आवक मोठ्या प्रमाणात झाली, दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला.

- इस्माईल जाहागिरदारवसमत (जि. हिंगोली): येथील कृऊबा बाजार समिती मोंढ्यात शुक्रवारी ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात ११ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही बिटात हळद २३ हजार रुपयांवर हळद गेली होती. हळदीचे दर ५ दिवसांपासूर स्थिर होते. शुक्रवारी झालेल्या बिटात सर्वाधिक ३० हजार व त्यानंतर २५ हजारांचा दर हळदीस मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे.

वसमतच्या मोंढ्यात ४ ऑगस्ट रोजी हळदीच्या ८ हजार कट्यांची आवक आली होती. शुक्रवारी हळदीचे बोली बिट झाले बिटात हळदीस ११ हजार ते १६ हजार रुपयांचा दर मिळाला. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले (रा दिग्रस) यांच्या दर्जेदार हळदीच्या ६ कट्ट्याला ३० हजार तर शेतकरी मारोतराव पवार (रा. रेडगाव) यांच्या ५१ कट्ट्याच्या लॉटला २५ हजार दर मिळाला. गत पाच दिवसांपासून हळदीचे दर स्थिर होते. 

शुक्रवारी आवक मोठ्या प्रमाणात झाली. दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला. यापेक्षाही जास्त दर हळदीस यावर्षी मिळेल, अशी अशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.  मोंढ्यात साधारण हळदीस १५ ते १६ हजारांचा दर मिळतो तर दर्जेदार हळदीचे दर उच्चांकी दर गाठत आहेत.

दर्जेदार हळदीच्या दरात उच्चांकी....४ ऑगस्ट रोजी कृऊबा समीती मोंढ्यातील बिटात सर्वाधिक ३० हजार व २५ हजार दर्जेदार हळदीस दर मिळाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करताना खात्री करावी.-तानाजी बेंडे, सभापती कृऊबा वसमत

दर्जेदार हळदीच्या दरवाढीची शक्यता ...दर्जेदार हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या बोली बिटात ६ कट्ट्याच्या लॉटला ३० हजार तर ५१ कट्ट्यांच्या लॉटला २५ हजार दर मिळाला. दर्जेदार हळीचे दर यापुढेही वाढतील, अशी अशा  आहे. साधारणत:हळदीचे दर ११ ते १६ हजारा पर्यंत होत आहे. - दौलत हुंबाड, अध्यक्ष व्यापारी संघ वसमत

समाधानकारक दर मिळाला...कृऊबा समीती मोंढ्यात दर्जेदार हळदीचे ६ कट्टे बिटात टाकले होते. हळद दर्जेदार होती. त्या प्रमाणात ३० हजार रुपयांचा समाधान कारक दरही मिळाला. हळदीस येवढा दर मिळेल अशा नव्हती.-शेषेराव बोंबले, शेतकरी,रा. दिग्रस, जि. परभणी

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली