शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत क्रेडिट सोसायटीच्या मॅनेजरचा रेल्वेरुळावर मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 18:47 IST

मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण शिवारात एका को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ४५ वर्षीय मॅनेजरचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. ही घटना ५ एप्रिल रोजी उघडकीस आली. मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. 

चंद्रशेखर जानकीराम थोरात (वय ४५ वर्षे रा. गोकुळधाम सोसायटी एनटीसी हिंगोली) असे मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. ते हिंगोली येथे हिंगोली अर्बन महिला को- ऑप क्रेडिट सोसायटीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, नवलगव्हाण शिवारात रेल्वे पटरीवर मृतदेह असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब फड, पोलिस अंमलदार अंकुश बांगर, नितीन हक्के, रेल्वे पोलिस रहेमत आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविली असता हा मृतदेह चंद्रशेखर थोरात यांचा असल्याचे स्पष्ट झाले. चंद्रशेखर थोरात यांनी आत्महत्या केली की मृत्यूचे अन्य कारण आहे हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. 

बँकेच्या अध्यक्षाच्या पतीने केला होता आत्हत्येचा प्रयत्नदरम्यान, हिंगोली अर्बन महिला को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षाच्या पतीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे क्रेडिट सोसायटीत अपहार झाल्याचा आरोप करीत अनेक ग्राहकांनी खात्यातून पैसे काढण्यासाठी क्रेडिट सोसायटीत गर्दी केली होती. चंद्रशेखर थोरात यांचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्यानंतर बँकेत अपहार तर झाला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. 

ठेवी काढण्यासाठी क्रेडिट सोसायटीत गर्दीहिंगोली अर्बन महिला को- ऑप क्रेडिट सोसायटीत  ठेवीदारांकडून ठेवी काढण्यासाठी रोज गर्दी होत आहे. मात्र बँकेच्या अध्यक्षांच्या पतीच्या प्रकृतीच्या कारणावरून या ठेवी मिळण्यास अडचणी येत आहेत. या ठेवी अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेल्या असल्याने ग्राहकांना परत करणे शक्य होत नाहीत. शिवाय कर्ज वाटप केलेले असल्यानेही ठेवी देता येत नसल्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी मागील काही दिवसांपासून तणावाखाली वावरत होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा होत आहे. तर ठेवीदार मात्र आता हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणखी एक क्रेडिट सोसायटी डबघाईस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू