शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ अन् भाचास नांगरास जुंपलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर थेट कृषिमंत्र्यांनी पाठवली बैलजोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:39 IST

अल्पभूधारक शेतकऱ्याने बैलजोडी नसल्याने भाऊ आणि भाचाच्या खांद्यावर जू देत हळदीच्या शेतात सरी मारल्या होत्या, लोकमत वृत्ताची दखल घेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली मदत

- इस्माईल जहागीरदारवसमत : तालुक्यातील सिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांनी बैलजोडी नसल्याने भाऊ व भाचाच्या खांद्यावर जू देत हळदीच्या शेतात सरी मारल्या होत्या. या बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेत स्वत:च्या पैशातून शेतकऱ्यास बैलजोडी उपलब्ध करून दिली. गुरूवारी ही बैलजोडी शेतकऱ्यांच्या स्वाधीन केली. वसमत तालुक्यातील सिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांना दोन एकर शेत जमीन आहे. दोघा भावांचा यावर उदरनिर्वाह चालवतो. त्यांनी आर्धा एकर शेतात हळद लागवडीचे नियोजन केले आहे. जमीन कमी असल्यामुळे बैलजोडी घेणे परवडत नाही. तसेच सध्या खरीपाची लगबग असल्याने इतर शेतकऱ्यांकडून बैलजोडी मिळणे अवघड बनले होते. त्यामुळे हळद लागवडीसाठी शेतात सरी कशी मारायची याची चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी भाऊ व भाच्याच्या खांद्यावर जु देत सरी मारण्याचा निर्णय घेतला. भाऊ व भाचाला जु ला जुंपत २४ जून रोजी दिवसभर शेतात सरी मारल्या. शेतकऱ्यांची चाललेली धडपडीबाबत लोकमतने २५ जूनच्या अंकात प्रकाशित केले होते. 

या बातमीची आमदार राजू नवघरे यांनी दखल घेत ही माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिली. त्यांनी शेतकऱ्याबद्दलची माहिती घेत बैलजोडी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २७ जून रोजी शेतकऱ्याच्या बांधावर बैलजोडी दाखल झाली. थेट कृषिमंत्र्यांनी बैलजोडी पाठवलेली पाहून पुंडगे कुटूंबिय भावूक झाले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, कांचन शिंदे,आदित्य आहेर, महेश व्हडगीर,त्र्यंबक कदम,प्रशांत शिंदे, पिंपळदरीचे सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे आदींची उपस्थिती होती. 

लोकमतचे मानले आभार...लोकमतमध्ये वृत प्रकाशित होताच माझ्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांची दखल घेतली गेली. शेतकऱ्यांचे दुख काय याची जान करुन देण्यात लोकमतचा वाटा खूप मोठा आहे. लोकमतचे आभार व्यक्त करतो.-बालाजी पुंडगे, शेतकरी

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी