शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! डोळ्यात मिरचीपूड टाकत तलाठ्याची हत्या; चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 09:17 IST

जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, आडगाव रंजे (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. २८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तलाठ्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

संतोष देवराव पवार (३६, रा. वाढोणा, ता. सेनगाव) असे हत्या झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. ते बुधवारी दुपारी आडगाव (रंजे.) येथील तलाठी सज्जा कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज करत होते. त्यांच्याकडे बोरी सावंत सज्जाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्या ठिकाणचा एकजण शेतीविषयक कामकाजासंदर्भात तिथे आला. या ठिकाणी दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. त्याने तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भोसकले. ग्रामस्थांनी जखमी पवार यांना परभणी येथे उपचारासाठी हलविले. परंतु, डाॅक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली