शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

गॅपला बगल देत दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

जिल्ह्यात गतवर्षी ५३ केंद्रावर दहावीच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी १८ हजार २२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ...

जिल्ह्यात गतवर्षी ५३ केंद्रावर दहावीच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी १८ हजार २२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर बारावीच्या १३ हजार २६५ विद्यार्थ्यांसाठी ३३ केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. दहावी, बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असतानाच कोरोनाचे संक्रमण सुरू झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गॅप देण्याचा निर्णय घेतला होता. २०२०-२१ शैक्षणिक सत्राचा दहावी, बारावीचा अभ्यासक्रम कोरोनामुळे पूर्ण होऊ शकला नाही. तरीही दहावीच्या १९ हजार ४०७ तर बारावीच्या परीक्षेसाठी १४ हजार ३८७ विद्यार्थी बसले आहेत. यावर्षी परीक्षा द्यायची की नाही, या चिंतेत दहावी, बारावीचे विद्यार्थी होते. मात्र ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याला अनेक शाळांनी प्राधान्य दिले. आता परीक्षा जवळ आली असून कोरोनामुळे गॅप द्यायचा नाही, अशी भूमिका बहुतांश विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

अंतिम मुदतीनंतरच पूनरपरीक्षार्थीची संख्या समजणार

१) दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा अर्ज भरणे अजूनही सुरू आहे. विलंबाने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच नियमित व पुनरपरीक्षार्थींची संख्या समजणार आहे. सध्या तरी परीक्षा विभाग केंद्र निश्चितीसाठी तयारी करीत आहे.

२) कोरोनामुळे विद्यार्थी संख्येत घट होईल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र गतवर्षी पेक्षा यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोना असला तरी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

दहावीचे परीक्षार्थी

२०२१ -१९४०७

२०२० - १८२२७

बारावीचे परीक्षार्थी

२०२१ - १४३८७

२०२० - १३२६५