शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'त्या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते, पण फक्त माझाचा व्हिडिओ व्हायरल केला'; आमदार राजू नवघरेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 14:07 IST

'मी एकट्यानंच पाप केलं असेल तर त्यासाठी फाशीला जायला तयार आहे.'

हिंगोली: वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल दाखल झाला. शहरात दाखल होताना ट्रकमध्येच असलेल्या पुतळ्याची तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र या वेळेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये आमदार राजू नवघरे पुतळ्यावर चढून महाराजांना हार घालताना दिसत आहेत. व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदारावर टीका होऊ लागली. पण, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारांनी जाहीर माफी देखील मागितली. तसेच, माफी मागताना आमदारांना यांना आपले अश्रू अनावर झाले. 

हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्नाकृती पुतळा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मात्र, असं करताना राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित होते. हा व्हिडीओ  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

राजू नवघरेंना अश्रू अनावर...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार आमदार राजू नवघरेंवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. यानंतर माध्यमांसमोर येऊन त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. 'पुष्पहार अर्पण करताना सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं होतं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका, पण मला त्यांनी अखेर वर चढवलं. पुतळ्याची उंची 16 फूटांची आहे. मी तिथे पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. विविध पक्षाचे नेते तिथे होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, तर त्याच्याविरोधात सगळे पेटून उठायचं काम करत आहेत', असं सांगताना नवघरेंना अश्रू आवरले नाहीत.

...तर फाशीही जाईलकार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते. पण, मी एकटाच चढलो असं दाखवलं जात आहे. मी एकट्यानंच पाप केलं असेल तर मी त्यासाठी फाशीला जायला तयार आहे. पण माझी काहीही चूक नसताना आमदार झाल्यापासून मला त्रास देण्याचं काम केलं जातय. विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका' असंही राजू नवघरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNCPराष्ट्रवादी काँग्रेसHingoliहिंगोली