मार्च महिन्याचा शिक्षकांचा पगार थेट सीएमपीद्वारे खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:00+5:302021-05-06T04:32:00+5:30

सीएमपी प्रणालीद्वारे पगार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कावरखे, नंदकुमार मारकड, प्रवीण पांचाळ, सचिन गायकवाड, रमेश ...

Teachers' salaries for the month of March are directly credited to the account through CMP | मार्च महिन्याचा शिक्षकांचा पगार थेट सीएमपीद्वारे खात्यात जमा

मार्च महिन्याचा शिक्षकांचा पगार थेट सीएमपीद्वारे खात्यात जमा

Next

सीएमपी प्रणालीद्वारे पगार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कावरखे, नंदकुमार मारकड, प्रवीण पांचाळ, सचिन गायकवाड, रमेश खंदारे यांनी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पाते यांना निवेदन देऊन मागणी केली होती. १८ कोटी ३५ लाख रुपयांची रक्कम सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामध्ये पतसंस्था व बँकांची कपात रक्कम १ कोटी ६९ लाख मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कोषागारातील पगार बिले मंजूर झाल्यावर २ कोटी ७४ लाख जीपीएफ खात्यावर जमा झाले व गटविमा १३ लाख ८२ हजार गटविमा खात्यावर जमा झाला, व्यवसाय कर ७ लाख २५ हजार शासनखाती जमा झाला आहे.

Web Title: Teachers' salaries for the month of March are directly credited to the account through CMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.