२४ हजार व्यक्तींना सहव्याधी; उपचार घेण्यासाठी कवायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:48+5:302021-06-02T04:22:48+5:30

हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर चांगलाच वाढला होता. त्यामुळे या काळात नागरिकांना इतर आजारांवर उपचार घेण्यासाठीही रुग्णालयात येण्याची ...

Symptoms of 24,000 people; Exercises for treatment | २४ हजार व्यक्तींना सहव्याधी; उपचार घेण्यासाठी कवायत

२४ हजार व्यक्तींना सहव्याधी; उपचार घेण्यासाठी कवायत

googlenewsNext

हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर चांगलाच वाढला होता. त्यामुळे या काळात नागरिकांना इतर आजारांवर उपचार घेण्यासाठीही रुग्णालयात येण्याची भीती वाटत होती तर गंभीर आजाराच्या रुग्णांना वारंवार तपासणी करून उपचार घेणे क्रमप्राप्त असते. अशा रुग्णांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत अनेकदा ओरडही व्हायची. किडनीच्या आजाराच्या रुग्णांचे तर डायलिसिससाठी मोठे हाल झाल्याचे पहायला मिळाले. नंतर रुग्णालयांनी व्यवस्था केल्याने बाधितांचेही डायलिसिस करता येत होते. आता या सर्व्हेक्षणातून उपलब्ध झालेल्या आकडेवारीचा लसीकरणासाठीही फायदा होत आहे.

कोविडचे १९३ रुग्ण आढळले होते

माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रामात केलेल्या तपासणीत तापमान, ऑक्सिजन सॅच्युरेशन आदी बाबींचीही तपासणी करण्यात येत होती. त्यात काही जणांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळली. अशांची संख्या १३४४ होती. त्यांची चाचणी केली असता त्यापैकी १९३ बाधित आढळले होते.

तर इतर आजारांच्या रुग्णांना कोरोनापासून मोठा धोका असल्याने अशा २४ हजार लोकांना या काळात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, याचे मार्गदर्शन करता आले. त्यामुळे अनेकांचा कोरोनापासून बचाव करता आला.

अशी आढळली रुग्णसंख्या

जिल्ह्यात केलेल्या सर्व्हेक्षणात मधुमेहाचे ९२३५, हायपरटेंशनचे १३ हजार ९११, किडनीच्या आजाराचे ५९, लिव्हरच्या आजाराचे २२ तर इतर गंभीर आजारांचे ८६६४ जण आढळले होते. या सर्वांना नंतर लसीकरणाबाबत आशा स्वयंसेविकांमार्फत मार्गदर्शन करून आधी लसीकरण करून घेण्यासाठी प्राधान्याने कळविण्यात आले होते.

हिंगोली जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा उपक्रम राबविल्याने कोरोनाविषयक जागृती निर्माण झाली. इतर गंभीर आजाराच्या लोकांना माहिती देऊन सजग करता आले. शिवाय कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांच्या तपासण्या झाल्या. लसीकरणासाठी गंभीर रुग्णांना कळविता आले.

-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

हिंगोलीत सर्वाधिक या उपक्रमात हिंगोली व वसमतला सर्वाधिक ७५४८ सहव्याधीग्रस्त आढळून आले. त्या तुलनेत औंढ्यात सर्वांत कमी असल्याचे दिसून आले.

सहव्याधी असलेल्या व्यक्ती

हिंगोली ७५४८

वसमत ७५४८

कळमनुरी ५५६६

सेनगाव ४०५५

औंढा ४०३३

एकूण कुटुंबसंख्या २.३६ लाख

किती कुटुंबांचा सर्व्हे केला २.३३ लाख

सर्व्हेक्षणासाठी नेमलेली पथके १४३०

पथकातील कर्मचारी ४२९०

Web Title: Symptoms of 24,000 people; Exercises for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.