शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दांडेगावच्या केळीचा परदेशात गोडवा; इराण, इराक अन् दुबईच्या बाजारपेठेतून मोठी मागणी

By रमेश वाबळे | Updated: July 10, 2023 15:20 IST

नियोजन आणि मेहनतीच्या बळावर शेतकऱ्यांनी गाठली परदेशी बाजारपेठ

- विश्वास साळुंकेवारंगाफाटा (जि. हिंगोली) : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय अडचणीत आल्याचे काही जण सांगतात. परंतु, या संकटांवर मात करीत काटेकोरपणे नियोजन आणि मेहनतीच्या बळावर कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव भागातील शेतकऱ्यांनी परदेशी बाजारपेठेत केळीचे उत्पादन पोहोचविले आहे. या केळीने थेट स्थानिक बाजारपेठांसह इराण, इराक, दुबईच्या बाजारपेठेतही गोडवा निर्माण केला आहे.

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, डोंगरकडा, सुकळी वीर, गुंडलवाडी, रेडगाव, वडगाव, जवळा पांचाळ या भागांत केळीकडे प्रमुख पीक म्हणून पाहिले जाते. बहुतांश शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेतापैकी जवळपास ६० ते ७० टक्के क्षेत्रावर केळीची लागवड करतात. तर, इतर क्षेत्रावर हळद, ऊस व पारंपरिक पिके घेतली जातात. काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर या भागातील शेतकऱ्यांच्या केळीने स्थानिक बाजारपेठ तर काबीज केलीच. शिवाय आता परदेशाच्या बाजारपेठेतही गोडवा निर्माण केला आहे. कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे केळी अल्पदरात विकावी लागली. परंतु, शेतकऱ्यांनी न खचता उत्पादनात वाढ केली. आता दरवर्षी लाखो रुपयांचे उतीसंवर्धित केळीची रोपे विकत घेऊन लागवड केली जाते. या केळीचे योग्य नियोजन करून जोपासना करण्यात येते. दांडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या केळी जागतिक बाजारपेठेमध्ये निर्यात केली जात असून येथील केळीला परदेशातही मागणी वाढत आहे.

दोन ते अडीच हजारांचा भावबाजारपेठेत सध्या दांडेगावच्या केळीला दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. शेतकरी शंकर साळुंके, दिलीपराव इंगोले यांनी उत्पादित केलेली केळी बाहेर देशात विक्रीसाठी जात आहे. एका कंपनीमार्फत शेतकऱ्यांची केळी इराण, इराक, दुबई आदी देशांत निर्यात करण्यात येत आहे. परदेशातील बाजारपेठेतही केळीला समाधानकारक भाव मिळत आहे.

समाधानकारक उत्पन्न...दांडेगाव व कुरुंदा भागात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. पूर्वी व्यापाऱ्यांकडून हमाली, कमिशनच्या नावाखाली कमी भाव मिळत होता. आता मात्र थेट कंपनीमार्फत केळीची निर्यात करण्यात येत असल्यामुळे आडत, हमाली, वाहतूक खर्च लागत नसल्याचे उत्पादक शेतकरी दिलीप इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

इराणला १८ टन केळीची निर्यातदांडेगाव शिवारातील १८ टन केळीची निर्यात इराणच्या बाजारपेठेत करण्यात आली आहे. संबंधित कंपनीमार्फत ही केळी पाठविण्यात आली असून, यातून सुमारे बारा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे शेतकरी शंकर साळुंके यांनी सांगितले. तसेच, केळीचे उत्पादन निर्यातक्षम व्हावे यासाठी शेतकऱ्यांना श्रीधर गावंडे, सागर कोपर्डीकर, ज्ञानेश्वर पाबळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचेही साळुंके म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीfruitsफळेDubaiदुबई