गणेश मूर्ती विसर्जन मार्गाची पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:39+5:302021-09-11T04:29:39+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरासह जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक ...

Superintendent of Police inspects Ganesh idol immersion route | गणेश मूर्ती विसर्जन मार्गाची पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

गणेश मूर्ती विसर्जन मार्गाची पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरासह जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी त्या-त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी हिंगोली शहरातील गणेश मूर्ती विसर्जन स्थळ तसेच मार्गाची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिष देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, नगरपालिकेचे बाळू बांगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सव कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची ठाणेदारांनी खबरदारी घ्यावी व योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून विसर्जनाच्या दिवशी नगरपालिकेच्या पथकाच्या मदतीने गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

फोटो :

Web Title: Superintendent of Police inspects Ganesh idol immersion route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.