जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमीवर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST2021-08-15T04:30:56+5:302021-08-15T04:30:56+5:30

औंढा तालुक्यात एका अपघातात किशोर भुजबळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी औंढा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

Successful surgery on accidental injuries at District Hospital | जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमीवर यशस्वी शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमीवर यशस्वी शस्त्रक्रिया

औंढा तालुक्यात एका अपघातात किशोर भुजबळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी औंढा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. त्यांच्या तोंडाला जबर मार लागल्याने प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना मुख शल्य चिकित्सा विभागात दाखल करण्यात आले. या विभागाचे प्रमुख डॉ. फैसल सलीम खान यांनी जखमी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया केली. वेळीच शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाचे प्राण वाचले आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. फैसल सलीम खान यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातही चांगल्या सुविधा व वेळीच उपचार मिळत असल्याचे दिसत आहे.

फोटो :

Web Title: Successful surgery on accidental injuries at District Hospital