जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST2021-07-24T04:18:58+5:302021-07-24T04:18:58+5:30

हिंगोली: जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद करून भाजप कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपचे लोकसभा ...

Stop illegal trades in the district | जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

हिंगोली: जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद करून भाजप कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपचे लोकसभा संघटक विनायक भिसे पाटील यांनी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपासून अवैध धंदे सुरू आहेत. याकडे पोलीस प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच राजकीय द्वेषातून काहींच्या सांगण्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांवर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा प्रकार चुकीचा असून जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अन्यथा भाजपच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याना घेराव घालून तीव्र आंदॊलन छेडण्यात येईल, असे ते म्हणाले. यासंदर्भात २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह आदी प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही विनायक भिसे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Stop illegal trades in the district