नर्सी येथे भर दिवसा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:09 IST2018-02-14T00:09:32+5:302018-02-14T00:09:39+5:30

येथील ब्राह्मण गल्लीतील एकाचे दिवसाढवळ्या कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २० हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ फेब्र्रुवारी रोजी घडली.

 Steal the day at nurses throughout the day | नर्सी येथे भर दिवसा चोरी

नर्सी येथे भर दिवसा चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : येथील ब्राह्मण गल्लीतील एकाचे दिवसाढवळ्या कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २० हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ फेब्र्रुवारी रोजी घडली.
नर्सी येथील ब्राह्मण गल्लीमध्ये संदीप लासकर यांचे राहते घर असून १२ फेब्रुवारी त्यांच्या घरातील सर्वजण धार्मिक कार्यक्रमाला बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दगडाने घरामागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील भिंतीच्या देवळीतील स्टिलच्या डब्यात ठेवलेले रोख २० हजार ८९० रुपये चोरून नेले. घरातील इतर ठिकाणीही डबे, कपाटात काही सापडते का, याचा चोरट्यांनी शोध घेतला. मात्र आणखी काही त्यांच्या हाती लागले नाही.
लासकर सायंकाळी घरी आल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती नर्सी पोलिसांना देताच घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथकाने घटनास्थळापासून एमएसईबी कार्यालयापर्यंतच माग काढला. संदीप लासकर यांच्या फिर्यादीवरून नर्सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बालाजी येवते यांच्या मार्गदर्शनाखाली नागरे, चव्हाण, गारोळे हे करीत आहेत.

Web Title:  Steal the day at nurses throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.