आरटीई आॅनलाईन प्रवेशास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:22 IST2018-02-11T00:22:23+5:302018-02-11T00:22:25+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्या अनुषंगाने २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आटीईनुसार २५ टक्के आरक्षित जागेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली.

आरटीई आॅनलाईन प्रवेशास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्या अनुषंगाने २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आटीईनुसार २५ टक्के आरक्षित जागेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. जिल्ह्यातील ५९ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली. आता १० ते २८ फेबु्रवारी या कालावधीत पालकांनी पाल्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. एक लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाºया पालकांचे पाल्य प्रवेशास पात्र असणार आहेत. एससी व एसटी प्रवर्गातील पालकांना उत्पन्नाची अट नाही. आवश्यक व अचूक आॅनलाईन प्रणालीवर माहिती पालकांना भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केला जाणार आहे. आॅनलाईन अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेश प्रक्रियेची माहिती एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. स्मार्टफोनद्वारेही माहिती भरता येईल.
गतवर्षी आरटीई २५ टक्केच्या हिंगोली जिल्ह्यासाठी ५१२ जागा आरक्षित होत्या. चालू शैक्षणिक वर्षात यंदा जिल्ह्यासाठी जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ६९२ आरक्षित जागेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
प्रवेशासाठी पालकांनी स्वत: आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहेत. प्रवेशासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घटपट्टी, वाहनपरवाना, जन्म दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.
गटशिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्यातील ५९ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानने दिली.