मतदान साहित्य घेवून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST2021-01-15T04:24:55+5:302021-01-15T04:24:55+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, पानकनेरगाव, सवना, साखरा, पुसेगाव, जयपूर, वरुड चक्रपान, हत्ता, बाभुळगाव, आजेगाव मोठ्या ग्रामपंचायतसह सर्वच महत्त्वाचा ग्रामपंचायतच्या ...

मतदान साहित्य घेवून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, पानकनेरगाव, सवना, साखरा, पुसेगाव, जयपूर, वरुड चक्रपान, हत्ता, बाभुळगाव, आजेगाव मोठ्या ग्रामपंचायतसह सर्वच महत्त्वाचा ग्रामपंचायतच्या निवडणूकीकरीता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. अनेक मातब्बरांचे गाव पातळीवरील सूत्रे आपल्या ताब्यात रहावे या करीता प्रचारात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता मात्र मतदार काेणाला काैल देतात हे १८ जानेवारीच्या निकालानंतरचं स्पष्ट हाेणार आहे.
तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतपैकी १६ बिनविरोध झाल्या आहेत. ८१ ग्रामपंचायतच्या ५८६ जागेंसाठी २४७ बुथवर मतदान होणार आहे. त्याकरीता १०६७ मतदान अधिकारी व कर्मचारी गुरुवारी दुपारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर वाहनांसह रवाना झाले आहेत. सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सेनगाव पोलीस ठाण्याअंर्तगत ५ पोलीस अधिकारी, १३२ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. शांतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतली असून नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क निभवावा असे आवाहन तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी केले.