एसटीचे चाक निखळले; अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:22 IST2018-01-28T00:22:45+5:302018-01-28T00:22:53+5:30

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील पुलावर एसटीचे चालकाच्या बाजूचे चाक निखळल्याने चालकाने काही क्षणात ब्रेक लावल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला.

 ST walk wheels; Woe is avoided | एसटीचे चाक निखळले; अनर्थ टळला

एसटीचे चाक निखळले; अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्क
पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील पुलावर एसटीचे चालकाच्या बाजूचे चाक निखळल्याने चालकाने काही क्षणात ब्रेक लावल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
रिसोड आगाराची एम. एच. ०७ सी ९२८० या क्रमांकाची बस सेनगाव - रिसोड रस्त्यावरुन जात असताना पानकनेरगाव येथील पुलावर चालकाच्या बाजूचे एक चाक निखळल्याचे चालकाच्या लक्षात येतातच चालकाने ब्रेक लावला. बसमधून आवाज आल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराहट निर्माण झाली होती. मात्र रस्त्यावर उभी झालेली बस पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Web Title:  ST walk wheels; Woe is avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.