Spraying is required in case of infestation | खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी आवश्यक

खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी आवश्यक

बहुतांश ठिकाणी ऊसपिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा वेळी त्याच्या व्यवस्थापनासाठी ‘क्लोरपायरीफॉस’ २० टक्के २५ मि.लि. किंवा ‘क्लोरॅट्रानोलीप्रोल’ १८.५ टक्के ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. उसाला पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घेणेही गरजेचे आहे. उसात सकाळी किंवा सायंकाळी पाणी वेळेच्या वेळी देणे आवश्यक आहे. जेणेकरून ऊस वाळून जाणार नाही.

उशिरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळविणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये, असेही आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे.

उन्हापासून रोपांचे संरक्षण करावे

हंगामी फूलझाडांंची शेतकऱ्यांनी लागवड केली असल्यास उन्हापासून रोपांचे संरक्षण करावे. रोपांना नियमित व वेळेवर पाणी देणे आवश्यक आहे. जेणेकरून रोपांना ताण पडणार नाही, याची दक्षता शेेतकऱ्यांनी घ्यावी.

Web Title: Spraying is required in case of infestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.