शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:49 IST

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा पाटीजवळ उड्डाणपुलावर घडला अपघात

आखाडा बाळापूर ( हिंगोली ):  नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात उड्डाणपुलावर आज दुपारी साडेतीन वाजता दोन दुचाकींना पाठीमागून एका भरधाव कारने उडवले. यात दुचाकी वरील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. 

कळमनुरीकडून आखाडा बाळापुरकडे पाच जण दोन दुचाकीवर प्रवास करत होते. साळवा शिवारात भरधाव कारने (MH -14 GN-4225) समोरील दोन दुचाकींना ( क्र. MH-38 L-6830 व क्र. MH-38 AA-8853 ) उडवले. यात अजय मधुकर पाईकराव  (वय 35वर्ष), शिवराज पांडुरंग पाईकराव ( वय 33वर्ष),  सुनील चंपतराव धुळे ( वय 30 वर्षे, सर्व राहणार कान्हेगाव ता.कळमनुरी जिल्हा हिंगोली ) आणि प्रेमानंद सुदामराव वैद्य( वय 45), दिपाली प्रेमानंद वैद्य (वय 15 वर्षे, राहणार हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली ) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

महामार्ग पोलीस तातडीने मदतीला धावले...अपघाताची माहिती कळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.  महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक उमर शेख , जमादार थिटे,  गजानन आगलावे यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले .जखमींना उपचारासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. या अपघाताची बाळापूर पोलिसांना मात्र खबरही नव्हती.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात