बोंडअळीग्रस्त कपासीच्या पंचनाम्यांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:54 IST2017-12-15T23:52:41+5:302017-12-15T23:54:33+5:30
जिल्ह्यात बीटीसह सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला होता. शासनाने त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पथके स्थापन केली असून पंचनाम्यांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.

बोंडअळीग्रस्त कपासीच्या पंचनाम्यांना गती द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात बीटीसह सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला होता. शासनाने त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पथके स्थापन केली असून पंचनाम्यांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.
शासनाने हे पंचनामे करताना दोन महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये सातबाराला या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. तसेच या पिकाचे जिओ टॅगिंग करणे अनिवार्य आहे.
त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकाने या बाबी तपासून वेळेत पंचनामे सादर करण्यास सांगितले. वसमत तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र असल्याने या भागात मनुष्यबळ थोडे अधिक प्रमाणात लागणार आहे. इतर तालुक्यांत फारसे क्षेत्र नाही. यात वसमत-२२४४६, कळमनुरी-१३७९९, औंढा-१0१२८, सेनगाव-४९५५, हिंगोली-३२७0 हेक्टर असे कृषी विभागाकडील नोंदीनुसार तालुकानिहाय क्षेत्र आहे. आता बºयाच भागात सर्वे सुरू झाला आहे.