१२ मार्चपासून कोल्हापूर ते नागपूर विशेष रेल्वे सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST2021-03-13T04:54:27+5:302021-03-13T04:54:27+5:30
हिंगोली : प्रवाशांची सोय व्हावी म्हणून दक्षिण मध्य रेल्वेने कोल्हापूर ते नागपूर दरम्यान आठवड्यातून दोन दिवस विशेष रेल्वे ...

१२ मार्चपासून कोल्हापूर ते नागपूर विशेष रेल्वे सुरु होणार
हिंगोली : प्रवाशांची सोय व्हावी म्हणून दक्षिण मध्य रेल्वेने कोल्हापूर ते नागपूर दरम्यान आठवड्यातून दोन दिवस विशेष रेल्वे गाडी १३ मार्चपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्टेशन मास्तर रामसिंग मीना यांनी दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून १२ मार्चपासून सुरु होणार आहे. हिंगोली येथे ही रेल्वे शनिवारी सकाळी साडेचार वाजता दाखल होणार आहे. विशेष रेल्वे गाडीला मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अंजनी असे थांबे राहणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रवाशांनी कोल्हापूर, पुणे, कुर्ला रेल्वे गाड्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने कोल्हापूर ते नागपूर अशी विशेष रेल्वे मंगळवार आणि शनिवारी असे दोन दिवस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्टेशन मास्तर मीना यांनी सांगितले.