सेनगावजवळील कयाधू नदीत आढळले दुचाकीचे सुटे भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST2021-07-18T04:21:38+5:302021-07-18T04:21:38+5:30
सेनगाव परिसरातील कयाधू नदीत एका बुलेट दुचाकीचे काही सुटे भाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ...

सेनगावजवळील कयाधू नदीत आढळले दुचाकीचे सुटे भाग
सेनगाव परिसरातील कयाधू नदीत एका बुलेट दुचाकीचे काही सुटे भाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवरे, किशोर पोटे, सहायक फाैजदार बालाजी बोके, संभाजी लेकुळे आदींचे पथक १६ जुलै रोजी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नदी परिसरात एका बुलेटच्या चेसेस नंबर व इंजीन नंबरचा भाग घटनास्थळी आढळून आले. दुचाकीचे इतर भाग काढून नेल्याचे दिसत होते. पोलिसांनी चेसेस नंबर व इंजीन नंबरवरून दुचाकींचा शोध घेतला असता ही दुचाकी बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. या बाबत तेथील पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे का, ही दुचाकी येथे कशी आली, इतर भाग का काढून नेले, आदींचा तपास पोलीस करीत आहेत.