सात दिवसांची संचारबंदी उठताच भाजी खरेदी-विक्रीसाठी उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:03+5:302021-03-09T04:33:03+5:30

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ...

As soon as the seven-day curfew was lifted, there was a rush to buy and sell vegetables | सात दिवसांची संचारबंदी उठताच भाजी खरेदी-विक्रीसाठी उडाली झुंबड

सात दिवसांची संचारबंदी उठताच भाजी खरेदी-विक्रीसाठी उडाली झुंबड

Next

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. परंतु, सात दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी संचारबंदी उठविताच भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी व विक्रीसाठी एकच झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

मागील वीस-पंचवीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी संचारबंदी लागू केली होती. परंतु, कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढूच लागले होते. हे पाहून जिल्हा प्रशासनाने खबदारीचा उपाय म्हणून १ मार्च ते ७ मार्च या अशी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले होते. एवढे असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे मात्र फिरणे काही थांबत नव्हते. सात दिवस सुरु केलेल्या टाळेबंदीमुळे छोट्या व्यवसायिकांचे मात्र चांगलेच हाल झाले. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांना तर अर्धपोटीच उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

८ मार्चपासून नियम व अटी घालत संचारबंदी उठविली जाणार असल्याची माहिती कळताच भाजीमार्केटमध्ये छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजी खरेदी-विक्रीसाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील डिग्रस, जवळाबाजार, हट्टा, कुरुंदा, सेनगाव, पानकनेरगाव, औंढा, वारंगाफाटा, सवड, गोरेगाव, कन्हेरगावनाका, साखरा आदी ग्रामीण भागांतूृन भाजीपाला व्यवसायिकांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. शहरातील किरकोळ विक्रेते हे ठोक विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करताना पहायला मिळाले.

विनामास्क खरेदी-विक्री

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सुरुवातीपासून जिल्हा प्रशासन विनामास्क फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना देत आहे. परंतु, या सुचनांचा काही लोकांवर काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. सोमवारी तर भाजी मार्केटमध्ये विनामास्क खरेदी-विक्री केल्याचे पहायला मिळाले. बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी मास्क घालून पालेभाज्यांची विक्री करताना आढळून आले.

फोटो

Web Title: As soon as the seven-day curfew was lifted, there was a rush to buy and sell vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.