बस गळू लागताच प्रवाशांनी उघडली छत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:44+5:302021-09-08T04:35:44+5:30

नांदेड ते कळमनुरी (एमएच २० - बीएल ०१२१) ही बस ६ सप्टेंबर रोजी नांदेड येथून सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या ...

As soon as the bus started to rot, the passengers opened the umbrella | बस गळू लागताच प्रवाशांनी उघडली छत्री

बस गळू लागताच प्रवाशांनी उघडली छत्री

नांदेड ते कळमनुरी (एमएच २० - बीएल ०१२१) ही बस ६ सप्टेंबर रोजी नांदेड येथून सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हिंगोलीकडे निघाली. या दरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कळमनुरी डेपोच्या बसला गळती लागल्याने बसमधील प्रवाशांनी चक्क छत्रीचा आधार घेतला. ज्या प्रवाशांनी धावपळ करून बसमध्ये जागा पकडली होती. त्यांनी आपली जागा सोडून बसमध्ये उभे राहणे पसंत केले. बसला गळती लागल्याने एसटी महामंडळाने भंगार बसेसवर ताडपत्री अंथरावी, अशी मागणी संतप्त झालेल्या प्रवाशांनी केली. बसमधील प्रवासी भीमा सूर्यतळ, गोलू भालेराव यांनी पावसाच्या पाण्यामुळे बसला गळती लागल्याने संताप व्यक्त केला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बस दुरुस्तीची मागणी वाहकाकडे त्यांनी केली. एकंदर बसच्या गळतीमुळे चालक व वाहकालाही त्रास सहन करावा लागला.

फोटो ४१

Web Title: As soon as the bus started to rot, the passengers opened the umbrella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.