कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकामध्ये गहू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:33+5:302021-09-08T04:35:33+5:30
हिंगोली : लहान मुले खेळताना काय करतील याचा काही भरवसा नसतो. दिसलेली वस्तू ती लगेच तोंडात घालतात. तेव्हा लहान ...

कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकामध्ये गहू !
हिंगोली : लहान मुले खेळताना काय करतील याचा काही भरवसा नसतो. दिसलेली वस्तू ती लगेच तोंडात घालतात. तेव्हा लहान मुलांची काळजी घेणे हे पालकांचे अद्य कर्तव्य आहे. १ ते ५ वयोगटांतील मुलांची काळजी घेत, त्यांना लहान वस्तू खेळायला देऊ नये किंवा त्यांच्यासमोर ठेवू नये. मुलांची काळजी व्यवस्थितरीत्या घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सेफ्टी पिन, शेंगदाणे, बोर, चिंचुके, हरभरा व इतर लहान वस्तू मुलांजवळ ठेवू नयेत. लहान मुलांना याचे काही ज्ञान नसते. जी वस्तू हातात येईल ती वस्तू लगेच ती तोंडात टाकतात. अशा वेळी पालकांनी मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात वर्षभरात अशा जवळपास ७० घटना घडल्या आहेत. परंतु, शस्त्रक्रिया करण्याची काही गरज पडली नाही. अशा प्रकरणात एखाद्या वेळेस भूल देण्याची गरज पडते, असे डॉक्टरांनी सांगितले.
शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली नाही...
वर्षभरात जिल्हा रुग्णालयात अशा जवळपास ७० घटना घडल्या आहेत. परंतु, शस्त्रक्रिया करण्याची गरज काही पडली नाही. सहजरीत्या अशा छोट्या वस्तू काढलेल्या आहेत. यावेळी पालकांना मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
लहान मुले काय करतील याचा नेम नाही...
अनेक पालक लहान मुलांजवळ छोट्या-छोट्या वस्तू खेळण्यासाठी टाकत असतात. परंतु, अशावेळी लहान मुले त्या टाकलेल्या वस्तू उचलून तोंडात किंवा नाकात घालतात. खरे पाहिले तर पालकांनी लहान मुलांजवळ बोरांसारख्या वस्तू देणे चुकीचे आहे. लहान मुलांना एकटे सोडून पालकांनी कधीही दूर जाऊन बसू नये. मुलांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
अशी घ्या मुलांची काळजी...
लहान मुलांकडे लक्ष देणे पालकांचे पहिले कर्तव्य आहे. एक ते पाच वयोगटापर्यंतच्या मुलांना काही कळत नसते. दिलेली वस्तू ती लगेच तोंडात घालतात. तेव्हा कोणतीही वस्तू मुलांच्या हातात देण्याच्या आधी विचार करावा.
- डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ
सेफ्टी पिन, शेंगदाणे अशा लहान वस्तू नाका-तोंडात टाकण्याच्या घटना गत वर्षभरात ७०च्या जवळपास घडलेल्या आहेत; पण शस्त्रक्रिया करण्याची गरज काही पडली नाही. सहजासहजी त्या वस्तू काढलेल्या आहेत. पालकांंनी मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. नंदकिशोर करवा, कान, नाक, घसा तज्ज्ञ
डमी ११४३