शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आरक्षणासाठी अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतली झाडावरुन उडी; पत्नी, मुली देखत सोडले प्राण

By विजय पाटील | Updated: October 31, 2023 19:52 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शेतातील झाडावर चढून उडी घेतली.

हिंगोली: वसमत तालुक्यातील अकोली शिवारातील शेतात अल्पभूधारक ४८ वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वतः च्या शेतातील झाडावर जाऊन उडी घेतली. याचदरम्यान शेतात पत्नी व मुलगी कापूस वेचत होते. पत्नी व मुलीच्या डोळ्यादेखत शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:४५ वाजेदरम्यान अल्पभूधारक शेतकरी लिंबाजी धोंडिराम कदम (वय ४८) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शेतातील झाडावर चढून उडी घेतली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यावेळी मयत शेतकऱ्याची पत्नी व मुलगी शेतात कापूस वेचत होते. त्यांना आवाज येताच त्या दोघीनींही झाडाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत लिंबाजीने प्राण सोडला होता. दोघींच्या डोळ्यादेखत हृदय हेलावणारी घटना घडली. त्यामुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.

मयत शेतकऱ्याच्या पश्चातपत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतकऱ्यास दीड एकर शेत जमीन आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार संजय गोरे, अजय पंडित हे पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोलीFarmerशेतकरी