पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:54+5:302021-05-06T04:31:54+5:30

कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच ठिकाणी बसून कोरोनाबाधितांचा व्यायामही होत नाही. ज्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन ...

Sleep well and increase oxygen in the blood | पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा

पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा

Next

कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच ठिकाणी बसून कोरोनाबाधितांचा व्यायामही होत नाही. ज्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, अशा रुग्णांनी कोणत्याही वेळी पालथे झोपल्यास त्यांच्या ऑक्सिजन पातळीत हळूहळू वाढू होऊ शकते. या बरोबरच कोरोना बाधितांनी डाॅक्टर सांगतील तो व्यायाम करावा. पालथे झोपल्यास फुप्फुसाच्या मागच्या भागात हवा जाण्यास मदत होते. त्यामुळे ऑक्सिजन पातळीत वाढ होण्यासही मदत होते. विशेष करुन कोरोना बाधितांनी सकस आहारावरही भर द्यावा. झोपेतून उठल्यास काही त्रास होत असेल तर संकोच न करता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी रुग्णांना केले आहे.

कोरोना रुग्णांसाठी लाभदायक...

कोरोना रुग्णांनी स्वत:ची काळजी पुरेपूर घ्यावी. कोरोना महामारीने बाधित असलेल्या रुग्णांनी पालथे झोपल्यास ऑक्सिजनमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होते. विशेष म्हणजे कोरोना रुग्णाचे स्वास्थ्यही चांगले राहते. थकवा येत नाही, मन प्रसन्न राहते. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी कोरोना बाधित रुग्णांनी पालथे पडून झोप घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टर मंडळींनी कोरोना बाधितांना दिला आहे.

प्रतिक्रिया

पालथे झोपणे लाभदायकच असे आहे...

ज्या कोरोना बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, अशांनी जास्तीत जास्त वेळ पालथे झोपावे. कोरोना बाधित गरोदर माता असेल तर तिने पालथे झोपण्याचा प्रयत्न करु नये. कारण गरोदर मातांनी पालथे झोपल्यास बाळाला त्रास होतो. त्यामुळे गरोदर मातांनी घरातच डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा.

डाॅ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंगोली

पालथे झोपणे उत्तम व्यायाम...

कोरोना बाधितांनी पालथे झोपल्यास ऑक्सिजन पातळी

वाढण्यास मदत होते. कोरोना बाधितांनी दररोज सकस आहाराकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. बदाम, आक्रोड, सफरचंद हेही सकाळच्या वेळी आहारात ठेवावे.

-डाॅ. अगस्ती जवळेकर, हिंगोली

पालथे झोपणे हितावह...

पालथे झोपण्याचे अनेक फायदे आहेत. पालथे झोपल्यास ऑक्सिजनमध्ये तर वाढ होतेच, त्याचबरोबर शरीरासाठीही ते हितावह असेच आहे. इतर काही त्रास होत असल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्लाही घेणे आवश्यक असून आहारात सातत्य ठेवावे.

-डाॅ. राम मुंढे, हिंगोली

Web Title: Sleep well and increase oxygen in the blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.