जिल्ह्यात एसटीच्या सहा बसेस विजेवर धावतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:47+5:302021-09-02T05:03:47+5:30
१२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी पत्र काढले आहे. यासंदर्भात सर्व आगारांकडून माहिती मागविणे ...

जिल्ह्यात एसटीच्या सहा बसेस विजेवर धावतील
१२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी पत्र काढले आहे. यासंदर्भात सर्व आगारांकडून माहिती मागविणे सुरू केले आहे. प्रारंभी जिल्ह्यासाठी सहा बसेस पाठवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्ग कोणता ते अजून निश्चित नाही
मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सर्वच आगारांना पत्र पाठविले आहे. विद्युत बस ३०० किलोमीटर चालल्यानंतर त्याचे चार्जिंग करणे बंधनकारक राहणार आहे. ही बाब लक्षात घेता मार्गाची लांबी ३००पेक्षा अधिक नसावी, असेही नमूद केले आहे.
यंत्रणा उभारावी लागणार
nविद्युत बसच्या चार्जिंगकरिता आवश्यक ती यंत्रणा उभारावी लागणार आहे. या सेवेची नियते सुरू केल्यानंतर अन्य मार्गावर वर्ग करणे, सेवा बंद करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
nनियते तयार जिल्हा ते जिल्हा, तालुका ते तालुका, मध्यम, लांब पल्ला, शटल, विनावाहक अशा सेवांना प्राधान्य दिले जाईल.
खर्चात होणार बचत
सद्यस्थितीत डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाला बसेसचा मेंटेनन्स परवडेना झाला आहे. विजेवर चालणारी बस लवकर जिल्ह्यात आली तर एस. टी. महामंडळाचा अनाठायी होणारा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे तीनशे किलोमीटर झाल्यावर किमान तीन तासांचा व त्या प्रमाणात कालावधी चार्जिंगसाठी आवश्यक आहे. हा कालावधी चार्जिंगसाठी राखीव ठेवून नियते तयार करावीत, अशा मार्गदर्शक सूचनाही मुंबई येथील महाव्यवस्थापकांनी पत्रात दिल्या आहेत.
विजेवर चालणारी बस लवकरच सुरू
मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी परभणी विभागाला विजेवरील बसेसबाबत पत्र पाठविले असून, माहिती गोळा करणे सुरू आहे. याबाबत वरिष्ठस्तरावर हा निर्णय लवकरच घेतला जाईल.
-सिद्धार्थ आझादे,
पर्यवेक्षक, यांत्रिक विभाग, हिंगोली आगार