सहा पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क न राहणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:44+5:302021-06-19T04:20:44+5:30

हिंगोली : बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना कोंबिंग ...

Six police officers were alerted | सहा पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क न राहणे भोवले

सहा पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क न राहणे भोवले

हिंगोली : बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना कोंबिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या. या वेळी काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद न दिल्याने अशा कर्मचाऱ्यांवर काळे यांनी कारवाई करीत चांगलाच दणका दिला. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची शिस्त लागली आहे.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याची घटना १७ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये रक्कम गेली नसली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तत्काळ वायरलेसवरून कर्मचाऱ्यांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी या भागात कोंबिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्वत: या वर लक्ष ठेवून होते. सूचना मिळताच कर्मचारी कामाला लागले. मात्र सहा ते सात कर्मचाऱ्यांनी या सूचनांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत त्यांना दोनशे ते पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

वाहतूक शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांची मुख्यालयात रवानगी

एका ट्रकचालकाला पैसे मागल्याच्या कारणावरून शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी विकास गवळी व डिगांबर कापसे या दोन कर्मचाऱ्यांची मुख्यालयी रवानगी करण्यात आली आहे. हिंगोली शहरातील गारमाळ ते खटकाळी भागात एका ट्रकचालकाला पैसे मागल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळेही शहर वाहतूक शाखेतही कमालीची शिस्त लागली आहे. दरम्यान, गारमाळ ते खटकाळी या भागात दोन्ही कर्मचाऱ्यांना ड्युटी देण्यात आली होती. त्यामुळे केवळ दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे. यात दोन्ही कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचा कुठेही उल्लेख नसल्याचा आरोप वाहतूक शाखेतील काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Six police officers were alerted