लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरात दगडफेक करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळक्यास वसमत पोलिसांनी अटक केली. दोन गटांतील वादाच्या कारणाने भांडण झाले त्यातून पळापळ करून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे पोलीस निरीक्षक आर.आर. धुन्ने यांनी सांगितले.वसमत शहरात गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत हाणामाºया, लाठ्याकाठ्या घेवून धावाधाव असे प्रकार घडत होते. त्यामुळे व्यापारी भीतीपोटी दुकाने बंद करत होते.अफवाही पसरत होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत होते. बुधवारी रात्री घडलेल्या राड्या प्रकरणी वसमत शहर पोलिसांनी आठ जणांच्या टोळक्यास ताब्यात घेतले. या आठ जणांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. शहरात दोन टोळक्यांत वादावादी होवून त्यात भांडणे झाली. एकमेकांना मारहाण करत ही पळापळी झाली होती. नागरिक व व्यापाºयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोनि धुन्ने यांनी केले. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
दगडफेक घटनेप्रकरणी सहा जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:42 IST