रामकथेत रंगले सीतास्वयंवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:39 IST2017-12-30T23:39:37+5:302017-12-30T23:39:47+5:30
शहरातील रामलिला मैदानावर आयोजित संगीतमय रामायण कथेदरम्यान चौथ्या दिवशी रामलीला मैदानावर सीतास्वयंवर सोहळा पार पडला. प्रभू रामसिताच्या स्वयंवर सोहळ्यामध्ये गोरज मुहूर्तामध्ये चौदा मिनिटे उशिराने झाल्याने त्यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला असल्याचे हभप रामराव ढोक महाराज यांनी रामकथेदरम्यान सांगितले.

रामकथेत रंगले सीतास्वयंवर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील रामलिला मैदानावर आयोजित संगीतमय रामायण कथेदरम्यान चौथ्या दिवशी रामलीला मैदानावर सीतास्वयंवर सोहळा पार पडला. प्रभू रामसिताच्या स्वयंवर सोहळ्यामध्ये गोरज मुहूर्तामध्ये चौदा मिनिटे उशिराने झाल्याने त्यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला असल्याचे हभप रामराव ढोक महाराज यांनी रामकथेदरम्यान सांगितले.
संगीतमय रामायण कथेच्या चौथ्या दिवशी सीतास्वयंवर सोहळा झाला. या सोहळ्यामध्ये प्रभू राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह सीता, उर्मिला, मांडवी, सुतकिर्ती यांच्यासोबत लावण्यात आला. राजा जनकाने नम्रता दाखवून आनंदाने अविस्मरणीय क्षण अनुभवला. एकवीस वेळा पृथ्वी नि:शस्त्र करणाºया परशुरामाने विष्णू अवतार प्रभुरामाला वंदन केल्याने राजा जनक धन्य झाल्याचे म्हणाला. तसेच यासह विविध मार्मिक दाखले देत जीवनातील प्रश्नोत्तर म्हणजे रामकथा असल्याचे हभप रामराव ढोक महाराज यांनी सांगितले.
११ हजार मेणबत्त्या पेटवून आज होणार नवीन वर्षाचे स्वागत
रामायण कथेदरम्यान ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता हभप रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री १० वाजता जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ११ हजार मेणबत्त्या पेटवून महाआरतीने नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.