रस्ता कामासाठी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:33+5:302021-01-23T04:30:33+5:30

शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील कमला नगर(भीम नगर ), डॉ. आंबेडकर नगर, शाहू नगर, ज्योती नगर, साई नगर, सम्राट ...

Sit-in agitation in front of the municipality for road works | रस्ता कामासाठी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन

रस्ता कामासाठी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन

शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील कमला नगर(भीम नगर ), डॉ. आंबेडकर नगर, शाहू नगर, ज्योती नगर, साई नगर, सम्राट अशोक नगर आदी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक भागातील अंतर्गत रस्त्याची कामे होत असताना या भागातील रस्त्याचे कामही मार्गी लावावे, अशी मागणी नगरपालिकेकडे लोकराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कळासरे आदींनी नगरपालिकेकडे मागणी केली होती. मात्र या मागणीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने लोकराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. २२ जानेवारी रोजी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. विकासकाम ही बाब धोरणात्मक असल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये ठेवून ठरावाप्रमाणे निधी उपलब्धतेनुसार कामे करण्यात येतील, असे या लेखी आश्वासन उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Sit-in agitation in front of the municipality for road works