साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:15+5:302021-04-01T04:30:15+5:30

मुंबईमधील नौदल वैद्यकीय संस्थेच्या नावीन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. घोष यांनी ही किट तयार केली आहेत. पीपीई ...

Sir, let's die with PPE kit, not Corona! | साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !

साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !

मुंबईमधील नौदल वैद्यकीय संस्थेच्या नावीन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. घोष यांनी ही किट तयार केली आहेत. पीपीई किट म्हणजे ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीई असे म्हटले जाते. किटमुळे जीव गुदमरत असून, किट घालून रुग्णांची सेवा करावी लागत आहे. किट परिधान करायला दहा मिनिटे लागतात. किटमुळे धड चालताही येत नाही. शरीर संपूर्णपणे झाकले गेल्याने हवा पण येत नाही. आमच्या संरक्षणासाठी केली असली तरी आम्ही रुग्णांपर्यंत पोहोचतो की नाही, असे आम्हाला वाटते. ही किट घातल्यास रुग्ण काय? बोलतो आहे, हे पण कळत नाही. काही कर्मचारी वर्गाने किट घालणेही सोडून दिलेले आहे. सॅनिटायझर दस्तीवर टाकून दस्ती तोंडाला बांधलेली बरी, असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. ज्या रुग्णांना वाचविण्याकरिता आम्ही किट परिधान करत आहोत, त्यात आमचा जीव जातो की काय? असे खडेबोल एका कर्मचाऱ्याने सुनावले.

एक कर्मचारी म्हणाला, कोरोना परवडला साहेब, पण पीपीई किट नको रे बाबा. नवी किट काय अन् जुनी किट काय 'सब घोडे बारा टक्के' असेही म्हणायला विसरला नाही.

जिल्ह्यासाठी ३२ हजार पीपीई किट आलेल्या आहेत. सध्या १३ हजार ५०० किटचा वापर सुरू आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांना कमी पडू लागल्यास शासनाकडून अजूनही मागविण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आले.

Web Title: Sir, let's die with PPE kit, not Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.