शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साहेब! अंत पाहू नका, दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आलेत; कधी करणार कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:34 IST

नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय, केंव्हा करणार दारुबंदी; महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर

कळमनुरी(जि.हिंगोली): मागच्या काही महिन्यांपासून मुंढळ व परिसरातील अनेक गावांत दारु विक्रीचे प्रमाण वाढले आहे. नवरा दारु पिऊन घरात धिंगाना घालत आहे. दारु विक्रीचा परिणाम मुलाबाळांवरही होऊ लागला असून दारुपायी संसार उघड्यावर पडत आहे. तेंव्हा दारुबंदी त्वरित करावी, अशी मागणी करत महिलांनी पोलिस ठाण्याला निवेदन दिले.

कळमनुरी तालुक्यातील मुंढळ येथे काही महिन्यांपासून खुलेआम दारू विक्री होत आहे. त्यामुळे युवकवर्ग व्यसनाधिन बनू लागले असून घरातील कर्तापुरुष दारु पित असल्यामुळे लहान मुलांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी १३ जून रोजी कळमनुरीचे पोलिस ठाणे गाठून दारु बंदी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंढळ व परिसरातील अनेक गावांत सर्वच प्रकारची दारु विक्री सुरु आहे. यापुढे दारु विक्री बंद झाली नाही तर पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा  पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर मच्छिंद्रनाथ वाघ, महादू पोटे, गफार खान, शेख शेरू, पद्माबाई सोनुले, चंद्रकला पोटे, दुर्गाबाई पोटे, बालाबाई पोटे, लताबाई पोटे, मालनबी शेख, विमल सोनुळे, विमल गुदाल, गोदावरीबाई मोरे, सुरेखा बेले, चंदा रोशने, देवानंद रोशने, शेख मुख्तार, शेख गफार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांना देण्यात आले आहे.

साहेब ! महिलांचा अंत पाहू नका...दारुबंदी कायमची करा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु दारुबंदी विभागाला याचे काहीच वाटत नाही. आपल्याला दारु विक्रीतून महसूल मिळतो एवढे मात्र दारुबंदी विभागाला चांगले ठावूक आहे. गरीब महिलांचे संसार दारुमुळे उघड्यावर येत आहेत, याचे काहीच दारुबंदी विभाग व तालुका प्रशासनाला काहीच वाटत नाही. महिलांचा अंत न पाहता लवकरात लवकर दारुबंदी करावी, असा इशाराही महिलांनी दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीalcohol prohibition actदारुबंदी कायदा