झोंबत्या गारव्याने लवकर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:30 IST2017-12-20T00:30:04+5:302017-12-20T00:30:13+5:30
मागील दोन दिवसांपासून दिवसाही गारठा जाणवू लागल्याने हिंगोलीकरांना उबदार कपड्यांशिवाय सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हवेतील या गारव्यामुळे शेकोट्या पटू लागल्या असून बाजारपेठेतही लवकरच शुकशुकाट पसरत असल्याचे दिसून येत आहे.

झोंबत्या गारव्याने लवकर शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दोन दिवसांपासून दिवसाही गारठा जाणवू लागल्याने हिंगोलीकरांना उबदार कपड्यांशिवाय सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. हवेतील या गारव्यामुळे शेकोट्या पटू लागल्या असून बाजारपेठेतही लवकरच शुकशुकाट पसरत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा हिवाळा सुरू झाल्यापासून थंडीचा कडाका तेवढा जाणवत नव्हता. अधून-मधून राहात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तर थंडी जणू गायबच झाल्याचे वाटत होते. ओखी वादळामुळे सलग चार ते पाच दिवस तर चक्क ढगाळच वातावरण होते. त्यामुळे कधी उन्हाचा कडाका, कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव येत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे पारा १३ अंशांपर्यंत खाली उतरला असला तरीही हवेत मात्र कमालीचा थंडावा आहे. यामुळे रात्रीचा प्रवास करणाºयांची संख्या घटली आहे. मोकळ्या भागात तर थंडी अधिक जाणवत आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना पुन्हा मागणी होत आहे. तर सायंकाळच्या वेळी उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडणेही शक्य होताना दिसत नाही. या थंडीमुळे लहान मुले, वृद्धांना सर्दी, खोकला आदीचा त्रास जाणवत असल्याचेही दिसून येत आहे. या हिवाळ्यात पहिल्यांदाच हिंगोलीकरांना थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला आहे.