शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या रेशन दुकानात काळा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:58 IST

आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता.

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा, तिघे ताब्यात सेनगावात १८ लाखांचा मुद्देमाल जप्त 

सेनगाव (जि. हिंगोली) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजिनी खाडे यांच्या रेशन  दुकानावर धाड टाकली. या धाडीत ११२ क्विंटल धान्यासह १७ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सेनगाव पोलिसांनी  माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजिनी खाडे  यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी विशाल खाडे, अमजद पठाण व स. अजहर स. नूर यांना ताब्यात घेतले.

सपोनि उमाकांत चिंचोळकर, पोउपनि शिवम घेवारे, पोउपनि किशोर पोटे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेशन दुकानातील धान्य विक्रीसाठी नेत असताना धाड टाकत काळ्या बाजारात तांदूळ, गहू, तुरदाळ, हरभरादाळ धान्य चढ्या दराने विक्री करण्याचा उद्देशाने पोत्याची पलटी मारुन ट्रकमध्ये (क्र. एम.एच.३७ - १६०७) टाकत असताना रंगेहाथ पकडले. 

यावेळी पोलिसांनी रेशनचे धान्य, रिकामे पोते, रास्त भाव दुकानाच्या आॅनलाईन थम मशीन, असा एकूण ११२ क्विंटल धान्य, एक ट्रक, मोटारसायकल आदी एकूण १७ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोउपनि शिवसांंब घेवारे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजिनी खाडे यांच्यासह नातू विशाल विलास खाडे, अमजद खाँ शेरखाँ पठाण (रा.सेनगाव), सय्यद अझर सय्यद नूर (रा.रिसोड, चालक), समीर खान, सय्यद आझम सय्यद नूर, ट्रकमालक श्याम बाहेती (रा. वाशिम) व सरोजिनी खाडे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याआधीही पोलिसांची कारवाईआठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. यासंबंधी पोलिसांनी खाडे यांचा मुलगा सतीश खाडेसह अन्य दोघांवर कारवाई केली होती. ही कारवाई ताजी असताना पुन्हा एकदा माजी अध्यक्षा खाडे यांच्या रेशन दुकानावरीन तांदूळ, गहू, हरभरा, तूरडाळ हा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना बुधवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सलग कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीHingoliहिंगोलीraidधाड