शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! गोशाळेतील जनावरे झाली गायब; चालकावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 13:51 IST

१६ गोऱ्हे आणि २ बैल पोलिसांनी जप्त करून ते सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोपाल गोशाळेत ठेवली होती.

ठळक मुद्देअखेर हत्ता (ना.) येथील गोशाळा चालकावर गुन्हा दाखल

हिंगोली : गोरक्षणाच्या नावाखाली जनावरांच्या विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळा चालकावर अखेर २४ ऑगस्ट रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाला आहे. या गोशाळेतील गायब झालेली जनावरे थेट कत्तलखान्यात गेली आहेत की, शेतकऱ्यांना विकली याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. 

कत्तलखान्याकडे १८ जनावरे घेऊन जाणारे एक वाहन वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी २८ जुलै रोजी पकडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी तथा जनावरांचा मालक शेख अब्दुल शफी शेख अब्दुल मदार कुरेशी रा.परभणी याच्या ताब्यातून ३ लाख ६ हजार रुपये किंमतीची १६ गोऱ्हे आणि २ बैल पोलिसांनी जप्त करून ते सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोपाल गोशाळेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर बैलांचे मालक शेख अब्दुल शफी शेख अब्दुल मदार कुरेशी यांनी औंढा नागनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायलयात अर्ज दाखल करून, बैलांचा ताबा देण्याची विनंती केली होती.

न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी बैल ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानंतर बैलांचे मालक शेख अब्दुल शफी हे हत्ता नाईक येथील गोशाळेत बैलांचा ताबा घेण्यासाठी गेले. परंतु त्याठिकाणी केवळ दोनच बैल आढळून आले आणि उर्वरित बैलांचा अद्यापपर्यंत कुठेही थांगपत्ता लागला नाही. मालक शेख अब्दुल शफी यांनी अनेकवेळा गोशाळेत जावून गोशाळा चालक शिवाजी गडदे महाराज याला भेटण्याचा आणि बैलांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बैलही मिळाले नाही आणि महाराजही सापडले नाही. त्यामुळे बैलांच्या ताब्यासाठी मालकाने हिंगोली पोलीस अधीक्षकांना अर्ज देवून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीची मागणीही २१ ऑगस्ट रोजी केली होती. 

पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या प्रकरणात लक्ष घालून ४८ तासांत बैल न मिळाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. आणि याबाबत हट्टा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बबन राठोड यांच्या फियार्दीवरून आरोपी शिवाजी गडदे महाराज (गोपाल गोरखनाथ आदिवासी सेवाभावी संस्था) याच्याविरुद्ध विश्वासघात करून मालमत्तेचा अपहार करणे किंवा स्वत:साठी वापरणे यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ४०३, ४०६ नुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीcowगाय